Last Updated on January 15, 2023 by Taluka Post
Plane Crash: लँडिंगच्या वेळी विमान क्रॅश
Plane Crash
Plane Crash: हे विमान यति एअरलाइन्सचे (Yeti Airlines)होते. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. दरम्यान, लँडिंगदरम्यान विमान जमिनीवर आदळले. अचानक विमानाला आग लागली.?आमचा मराठी बातम्या WhatsApp ग्रुप जॉइन करा. जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा?
काठमांडू : नेपाळमधील(Nepal) पोखरामध्ये लँडिंग करताना विमान जमिनीवर आदळले. त्यामुळे विमानाला अचानक आग लागली आणि भीषण आग लागली. विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स(Crew members)होते. विमान अपघातात अद्याप कोणाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
A total of 68 passengers & four crew members were on board the Yeti airlines aircraft that crashed between the old airport and the Pokhara International Airport, Sudarshan #Bartaula, spokesperson of Yeti Airlines: The Kathmandu Post#nepal pic.twitter.com/ap0Q02NivV
— Rahul Sisodia (@Sisodia19Rahul) January 15, 2023
हे विमान यति एअरलाइन्सचे होते.(Plane Crash) हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. दरम्यान, लँडिंगदरम्यान विमान जमिनीवर आदळले. अचानक विमानाला आग लागली. काही वेळातच आग आटोक्यात आली. त्यामुळे या अपघातात काही जणांचा मृत्यू झाला असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नेपाळमधील जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
यासोबतच पोलीस, विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान, बचावकार्य सुरू असल्याने विमानतळ तूर्तास बंद करण्यात आले आहे. सोबतच या भागात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
विमान पोखराजवळ पोहोचले होते. हा अपघात डोंगरी भागात झाला असला तरी. विमान अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विमानातील प्रवाशांची माहिती घेतली जात असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा: पहिल्यांदाच तंबाखूपासून बनवण्यात आले कोकेन