हवामान बदलाची झळ सोसणाऱ्या गरीब देशांना मिळणार भरपाई

Last Updated on November 21, 2022 by Taluka Post

ऐतिहासिक करारावर ‘सीओपी-२७’मध्ये शिक्कामोर्तब, भारताकडून स्वागत

हवामान बदलाची झळ सोसणाऱ्या गरीब राष्ट्रांना नुकसानभरपाई देण्यासाठी विशेष निधी स्थापन करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासोबत इजिप्तमधील संयुक्त राष्ट्र हवामान परिषद अर्थात सीओपी २७ चा रविवारी समारोप झाला. भारतासह अनेक विकसनशील व गरीब राष्ट्रांनी या कराराचे स्वागत केले. जगाने या कराराची बऱ्याच करत भारताने ही परिषद ऐतिहासिक काळापासून वाट पाहिल्याचे नमूद ठरल्याचे म्हटले; मात्र परिषदेत सर्व प्रकारच्या जीवाश्म इंधनाचा वापर हवी तशी चर्चा झाली नाही.

इजिप्तच्या शर्म अल शेख शहरात संपन्न झालेल्या सीओपी-२७ मध्ये भारतीय वेळेनुसार रविवारी सकाळी पावणेआठ वाजता ऐतिहासिक कराराला मंजुरी देण्यात आली. हवामान बदलाचा फटका बसलेल्या गरीब देशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे; मात्र मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन करणाऱ्या अमेरिकेसह श्रीमंत देशांकडून सातत्याने याकडे कानाडोळा केला जात होता. आता मात्र प्रथमच हवामान बदलामुळे झालेल्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी, तसेच झालेल्या नुकसानीबद्दल गरीब देशांना आर्थिक स्वरूपात भरपाई दिली जाणार आहे. यासाठी विशेष निधीची स्थापना करण्याचा कराराचा मुख्य हेतू आहे. या करारासाठी भारताने रचनात्मक व सक्रिय भूमिका बजावली आहे. गरीब राष्ट्रांकडून प्रदीर्घ काळापासून याची मागणी केली जात होती. हवामान बदलाच्या संकटामुळे गरीब देशांना पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळ यासारख्या विविध दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे.

श्रीमंत देशांकडून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे हवामान बदलाचे संकट तीव्र झाल्याची गरीब राष्ट्रांची भूमिका आहे. त्यामुळे श्रीमंत देशांनी खर्चाचा भार उचलावा, अशी गरीब राष्ट्रांची अपेक्षा होती. संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटारेस यांनी सीओपी-२७ ने न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याचे नमूद करत यासंबंधीचे कराराचे स्वागत केले. परिषदेच्या समारोप सत्रात बोलताना भारताचे केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी करारावर सहमती बनवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांसाठी इजिप्तचे अभिनंदन करत कराराचे स्वागत केले. जगाने याची प्रदीर्घ काळापासून वाट च पाहिल्याचे यादव म्हणाले.हेही वाचा