दोन लाख भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेचा व्हिसा

Last Updated on November 20, 2022 by Taluka Post

चीनला मागे टाकले; दोन्ही देशांचे ५२ टक्के विद्यार्थी, गणित-कॉम्प्युटर सायन्सला प्राधान्य

अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या पुन्हा एकदा वाढत चालली आहे. २०२१ मध्ये या विद्यार्थ्यांमध्ये १९ टक्क्यांची वाढ झाली. २०२० मध्ये हे प्रमाण १३ टक्के घटले होते, असे ‘इन्स्टिट्युशन ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’च्या अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेत शिकणाऱ्या एकूण परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारत आणि चीनच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ५२ टक्के होते. २०२१-२२ मध्ये चीनने सर्वाधिक, दोन लाख ९० हजार ८६ विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठविले, तर भारताने


१ लाख ९९ हजार १८२ विद्यार्थी पाठविले. भारतीयांची ही वाढ १९ टक्के आहे. २०२१ मध्ये चीनने सर्वाधिक विद्यार्थी पाठविलेले असले, तरी त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत ते ९ टक्क्यांनी कमी होते. भारताने पाठविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र १९ टक्क्यांची वाढ झाली.

  • कोरोनाच्या निर्बंधांमुळे गतवर्षी चीनच्या विद्यार्थ्यांची संख्या घटली. भारतातून गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पदवीधरांचे प्रमाण जास्त होते.
  • गणित, कॉम्प्युटर सायन्सेस, इंजिनिअरिंग आणि बिझनेस मॅनेजमेंट या तीन विषयांच्या विद्यार्थ्यांचे परदेशात जाऊन शिकण्याचे प्रमाण मोठे आहे. दोन लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी गणित आणि १ लाख ८८ विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश घेतला. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये १६ टक्के, तर समाजविज्ञान शाखेत ८ टक्के आणि उपयोजित कला विषयात ५ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

नवे विद्यार्थी वाढले….

अमेरिकेत नव्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रमाण २०२१-२२ मध्ये ८० टक्क्यांनी वाढले. भारत, कॅनडा, मेक्सिको आणि नायजेरियातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कोरोनापूर्व पातळीवर आले. सर्वाधिक ८२ हजार विद्यार्थ्यांना गेल्या मे ते ऑगस्टदरम्यान व्हिसा देण्यात आला, अशी आकडेवारी भारतातील अमेरिकन दूतावासाकडून मिळते. गतवर्षीही अमेरिकेने ६२ हजार विद्यार्थ्यांना व्हिसा दिला होता. हेही वाचा महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक भरती 2022 | महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक 2428 पदांची भरती

Comments are closed.